Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
Maharashtra Rain: आज विकेण्डलाही राज्यात होणार मुसळधार, 24 तासांसाठी या शहरांना अलर्ट जारी
![Chance of heavy showers in next 5 days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/rain-drops-umbrella-raining-storm-weather-generic.jpg)
मुंबई: राज्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात पालघर, ठाणे, नाशिक, नगर जिल्हात पुढील 24 तासांत काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलबा वेधशाळेन वर्तविलेला आहे. मुंबईत काही भागात मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे. तिकडे पूर्व विदर्भात मुसळधार पावसानं हाहाकार उडालेला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक शहरांना जोडणारे मार्ग बंद करण्यात आलेले आहेत.
विदर्भ, मराठवाडा मागातही मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. पूर्व विदर्भात मुसळधार पावसानं हाहाकार मांडलेला आहे. अनेक शहरांना जोडणारे मार्ग बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. अशात भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती देण्यात येत आहे.