उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री सतीश महाना यांना कोरोनाची लागण
लखनऊ – देशात कोरोनाचा हाहाकार कायमच आहे. अगदी सर्वसामान्यांपासून राजकीय मंडळींना सुद्धा कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. अशातच उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री सतीश महाना यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. महाना यांनी स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. औद्योगिक विकास मंत्री महाना यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, कोरोनाची प्राथमिक लक्षण जानवत असल्याने,”मी काल आपली कोरोनाची चाचणी करून घेतली त्यात माझा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.”
“डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार मी घरीच क्वारंटाईन झालो आहे. माझी विनंती आहे की, जे कोणीही माझ्या संपर्कात आलेले आहेत त्यांनी आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी” असा ट्वीट महाना यांनी केला आहे. दरम्यान, यूपीत अनेक मंत्र्याना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी कमल रानी वरूण आणि चेतन चौहान या दोन मंत्र्यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.