Breaking-newsमहाराष्ट्र
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 7,47,995 वर
- मुंबईत 1217, पुण्यात 1795 नवे रुग्ण
मुंबई – राज्यात आज ११ हजार ६०७ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ३६१ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.६२ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ४३ हजार १७० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ८० हजार ७१८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.