Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
मिशन महापालिका : पिंपरी-चिंचवड भाजपा ‘हा’ पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीत दाखल!
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाचे माजी नगरसेवक व भाजपाचे शहर उपाध्यक्ष धनराज बिर्दा यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर व महासचिव अनिल जाधव यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवडमध्ये मोर्चेबांधणी करीत आहे.