औद्योगिक कंपन्यांमध्ये महाराष्ट्रीय मुलांसाठी ७० टक्के नोकऱ्या उपलब्ध करा : किरण मोरे
पुणे । प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांनी आपल्या कंपनीमध्ये ७० टक्के महाराष्ट्रीय तरुणांचा ७० संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, असंघटित कामगार विभागाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण मोरे यांनी केली आहे.
याबाबत चाकण एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कंपन्यांमध्ये महाराष्ट्रातील युवकांना हक्काचा रोजगार मिळाला पाहिजे. मात्र, कंपन्या परराज्यातील तरुणांना रोजगार देत आहेत. त्यामुळे कंपन्यांनी ७० टक्के रोजगार महाराष्ट्रातील युवकांसाठी राखीव ठेवावा. तसेच, जागांवर महाराष्ट्रीय मुलांना प्राधान्य द्यावे.
कार्यभार मिळाला अन् कामाला तात्काळ सुरूवात…
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी असंघटित कामगार विभागातर्फे पुणे जिल्हाध्यक्षा मीना मोहिते यांनी किरण मोरे यांची जिल्हा्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नितीन गायकवाड, सरचिटणीसपदी अरुण अवधूत यांचीही नियुक्ती झाली आहे. यावेळी जिल्हा सचिव गायत्री अस्वले, उगम चाफले, भूषण इंगळे, अनिकेत गुंजाळ आणि आकाश गुंजाळ उपस्थित होते. कार्यभार मिळाल्यानंतर मोरे यांनी आपल्या कामाला तात्काळ सुरूवात केली आहे.