Breaking-newsराष्ट्रिय
सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ
नवी दिल्ली – आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १९ पैशांची वाढ झाली आहे. मात्र मध्यंतरी एकतर्फी वाढ होत असलेले डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात सुस्तीचे वातावरण आहे. त्यानंतरही पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे. विशेष म्हणजे ऑगस्टमध्ये डिझेलचे दर २० दिवसांपासून स्थिर आहेत. जुलैमध्ये डिझेल १०वेळा महागले होते.
पेट्रोलच्या दरात आज १९ पैशांची वाढ झाल्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर ८१ रुपये १९ पैसे झाला असून डिझेल मात्र ७३ रुपये ५६ पैसे लिटर आहे. मुंबईतही पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १९ पैशांची वाढ झाल्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर ८७ रुपये ८७ पैसे झाला असून डिझेल ८० रुपये ११ पैसे लिटर आहे. चेन्नईत १७ पैसे तर बंगळुरूत २० पैसे लिटर एवढे पेट्रोल महागले आहे.





