मनोरंजन
श्रद्धा आणि राजकुमार यांच्या ‘या’ हॉरर सिनेमाचा टीझर रिलीज

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘स्त्री’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘स्त्री’ हा भयपट असून श्रद्धा आणि राजकुमार यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा टीझर शेअर केला आहे.
५९ सेकंदाच्या या छोट्या टिझरमध्ये एक निर्जन गाव दाखवण्यात आलं असून गावात भयाण शांतता पाहायला मिळते. टिझरमध्ये शेवटी गळफास घेतलेली एक स्त्री आणि तिची भयावह सावली दिसून येते. काहीसा भीतीदायक असा हा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.




