Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीमहाराष्ट्र
मुख्यमंत्र्याच्या हस्ते वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयात ध्वजारोहण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/uddhav-thackeray.png)
मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण केलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. तसेच, मंत्रालयातही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला संबोधित करताना म्हटलंय की आजपर्यंत महाराष्ट्रातील सर्वधर्मिय लोकांनी या कोरोना काळात खूप मदत केली आहे. लस अद्यापही तयार झालेली नसल्याने आरोग्य मंत्रालयाने आखून दिलेल्या नियमाने आपण कोरोनापासून दूर राहू शकू.
यावेळी त्यांनी राज्यातील आरोग्या व्यवस्थेविषयी माहिती दिली. जिल्हापातळीवर सुरू असलेल्या कामांविषयी त्यांनी माहिती दिली आहे. राज्यातील डॉक्टर, नर्स, इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांचे कौतुक केलं आहे.