Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

#CoronaVirus: नागपूरमध्ये रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ, 65 पेक्षा अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण

नागपूर: नागपूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. नागपुरात आतापर्यंत एकूण 65 पेक्षा अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण झालेली आहे. नागपूरमधील मेडिकल रुग्णालयात या आठवड्यात एकूण 36 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत.

मोठ्या संख्येने डॉक्टरांना कोरोनाची लागण होत असल्याने एकच खळबळ उडालेली आहे. नागपुरातील मेयो रुग्णालयातही या आठवड्यात 31 डॉक्टरांना कोरोनाची लागण झालेली आहे. कोरोनाबाधीत सर्व डॉक्टरांवर उपचार सुरु आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा सर्व डॉक्टर कोरोना वॉर्डात रुग्णसेवा करणार आहेत. डॉक्टर जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button