breaking-newsराष्ट्रिय
हावडात तृणमुल नेत्याची हत्या
हावडा – पश्चिम बंगाल मध्ये हावडा जिल्ह्यात तृणमुल कॉंग्रेस पक्षाच्या नेत्याची काल रात्री गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. मोहंमद मोहसिन खान असे त्यांचे नाव आहे. ते पक्षाच्य बगनान भागातील बुथ कमिटीचे सेक्रेटरी होते.
काल रात्री काम संपवून ते आपल्या घरी परतत असताना त्यांना हतुरिया गावात गोळ्या घालण्यात आल्या. त्यांची पत्नी तृणमुल कॉंग्रेसची ग्रामपंचायत सदस्य आहे. त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी हुतुरिया जवळील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती त्यामुळे तेथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.