Breaking-newsराष्ट्रिय

‘पापड खा अन् कोरोनाला लढा द्या’ म्हणणारे केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावर औषध किंवा लस येण्यावर रोज वेगवेगळे दावे आपण ऐकत असतो. अशात अमुक खाल्ल्याने कोरोना बरा होतो, म्हणणारे दावेही आपण ऐकले. यात एक दावा केला होतो केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी. पापड खाल्ल्याने कोरोना व्हायरस ठीक होईल, असा दावा त्यांनी केला होता, नंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याच मंत्री मेघवाल यांना आता कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी मेघवाल यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गृह मंत्री अमित शाह यांच्यानंतर केंद्र सरकारचे 2 मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि कृषि राज्यमंत्री कैलाश चौधरी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. मेघवाल आणि चौधरी या दोघांनीही ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button