Breaking-newsराष्ट्रिय

स्वातंत्र्य दिन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन करणारे ३५० पोलीस क्वारंटाईन

नवी दिल्ली – जगासह देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. स्वातंत्र्य दिन सोहळ्यावरही कोरोनाचे संकट घोंगावत आहे. कोरोनामुळे यंदा स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी विशेष खबरदारी घेत तयारी सुरु आहे. ही तयारी सुरु असतानाच 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या तब्बल 350 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांना क्वारंटाईन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावर झेंडा वंदन करून देशाला संबोधित करणार आहेत. मात्र कोरोनामुळे यंदा स्वातंत्र्य दिन सोहळा कमी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. याच सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. मात्र गार्ड ऑफ ऑनर या कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या 350 पोलिसांनाच क्वारंटाईन करण्यात आले आहे. यातील काही पोलीस हे इतर राज्यातील आहेत तर काही पोलीस वसाहतीत राहणारे आणि काही सार्वजनिक वाहनातून कामावर येणारे आहेत.

अशात त्यांना कुठेही कोरोनाची बाधा होऊ शकते. त्यामुळे या सर्व पोलिसांना दिल्ली कैन्ट येथील रिकाम्या असलेल्या पोलीस वसाहतीत क्वारंटाईन करण्यात आले आहे. या 350 क्वारंटाईन पोलिसांमध्ये पोलीस हवालदारांपासून पोलीस उपायुक्तांचा समावेश आहे. या सर्व पोलिसांना बाहेरील लोकांच्या संपर्कापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या शरीराच्या तापमानाची दररोज नोंद करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूच्या लक्षणांचीही तपासणी करण्यात येत आहे. 15 ऑगस्टवेळी लोकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. या सर्व पोलिसांना क्वारंटाईन करून 8 हून अधिक दिवस झाले आहेत. पोलीस वसाहतीच्या आतही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. क्वारंटाईन करण्यात आलेल्या यातील एकाही पोलिसात कोरोनाची लक्षणे आढळली नसल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group