उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यांदव रुग्णालयात
लखनऊ – समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यादव यांना पोटदुखी आणि लघवीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
समाजवादी पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून बिघडलेली आहे. त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी त्यांना लोहिया आणि मेदांता रुग्णालयात दाखल केले होते. काल रात्रीपासून त्यांना पुन्हा त्रास सुरू झाल्यामुळे मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना लघवीचे इन्फेक्शन झाले आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र ती निगेटिव्ह आली आहे, अशी माहिती मेदांता रुग्णालयाच्या संचालकांनी दिली.