मुंंबई व कोकणात पुन्हा पुढील 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता
![Heavy rains in Konkan; Public life disrupted in Ratnagiri](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/monsoon_rain_rainfall_-770x433-1.jpg)
मुंंबई व कोकणात पुन्हा पुढील 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कालपासून पावसाने थोडी विश्रांंती घेतली असली तरी आज मुंंबई शहर व उपनगरात पावसाचं पुन्हा आगमन होण्याचा अंदाज आहे. याशिवाय कोकण किनारपट्टीवर सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच खाजगी हवामान अंदाज संस्थांंच्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात नागपुर , मराठवाडा तसेच बुलढाणा या पट्ट्यात आज व उद्या मध्यम ते हलक्या सरी बरसतील.याबाबतची माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Capture-28.jpg)
सरत्या आठवड्यात मुंंबईत पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळाली होती, अशा प्रकारचा अतिमुसळधार पाउस आता पुन्हा 10 व 11 ऑगस्ट दरम्यान होण्याचा अंदाज आहे.दरम्यान ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे मुंंबईकरांवरचे पाणी कपातीचे संकट टळण्याचा अंदाज आहे, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी आणि वैतरणा या तलावक्षेत्रात उत्तम पाऊस झाला असुन मुंबईला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी ही मुख्य धरणे भरुन वाहु लागली आहेत.