Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची थेट पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

Share On

पुणे – पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पदोन्नती मिळाली आहे. आता त्यांची थेट पंतप्रधान कार्यालयात उप सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र पंतप्रधान कार्यालयाने जारी केले आहे .पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून पुढची ४ वर्षे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्या आधी त्यांनी जिल्हाधिकारी पदाच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करत ही नवीन जबाबदारी घ्यावी अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच, रुजू होण्याचे पत्र दिल्यापासून ३ आठवड्यांच्या आत कामावर रुजू होणे गरजेचे आहे असे देखील पत्रात नमूद करण्यात आली आहेत.

नवल किशोर राम यांची कारकीर्द कौतुकास्पद राहिलेली आहे. देशातील सर्वोत्तम ५० जिल्हाधिकाऱ्यांमध्ये त्यांची निवड झाली होती . फेम-इंडिया आशिया पोस्ट लोकप्रिय जिल्हाधिकारी सर्वेक्षण २०२० मध्ये त्यांनी स्थान पटकावले आहे . कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी उत्तम कामगिरी केल्याची पाहायला मिळाली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button