देशात महिन्याभरात सापडले ११ लाख नवे रुग्ण
नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनाने जगभरातील आपला विळखा अगदी घट्ट केला आहे. गेल्या एक महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात भारतात ११.१ लाख कोरोनाबाधित रुग्णांनी नोंद झाली आहे. तर, १९ हजार १२२जणांना कोरोनामुले आपले प्राण गमवावे लागले आहेत.
जून महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधितांची संख्या ४ लाखांच्यावर होती. तर, जुलै महिन्याच्या अखेरीस हाच आकडा १५ लाखांच्यावर गेला आहे. म्हणजेच, जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात २.८ टक्क्यांनी रुग्णवाढ झाली आहे. तर दुसरीकडे जून महिन्याच्या तुलनेत मृतांची संख्यादेखील १.६ टक्क्यांनी वाढली आहे. जून महिन्याच्या अखेरिस करोनामुळे झालेल्या मृतांची संख्याही ११ हजार ९८८ इतकी होती. जुलै महिन्यात करोनानं इतका वेग पकडला की अखेरच्या १५ दिवसांमध्ये तब्बल ७.३ लाख रुग्णांची नोंद करण्यात आली. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट आहे.