वसईत पहायला मिळतायत हे सुंदर परदेशी पाहुणे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Two_andeanflamingo_june2003_arp.jpg)
वसईत सध्या परदेशी पक्षी पाहायला मिळत आहे.वसईच्या सनसिटी, एव्हरशाईन, पापडी या परिसरातील मोकळ्या जागेवर पावसाच्या साचेलेल्या पाण्यात हे पक्षी पाहायला मिळत आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Capture-79.jpg)
वसईच्या एव्हरशाईन परिसरातील मिठागरमध्ये 50 च्या वर फ्लेमिंगो दाखल झाले आहेत.ड्रोनद्वारे फ्लेमिंगो पक्षांचे दृश्य घेण्यात आले आहेत.जुलै आणि ऑगस्टमध्ये शेकडो फ्लेमिंगो वसईत दाखल होत असतात.यंदाच्या वर्षी मात्र फ्लेमिंगो या पक्षाचे प्रमाण कमी झाले आहे.सकाळच्या आणि संध्याकाळच्या आल्हाददायक वातावरणात पक्षी पाण्यावर दिसतात.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/maxresdefault-5-1024x576.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/download-17.jpg)
पावसाच्या पाण्यात ते आपल्यासाठी शेवाळे, पाणकिडे, छोटे मासे असे खाद्य शोधतात.विशेषतः हे पक्षी गजबजलेल्या परिसरात न दिसता ते शांत परिसरात विहार करताना दिसतात.सध्या या पक्षांना पाहायला आणि त्याचे फोटो काढायला अनेक पक्षीप्रेमी गर्दी करताना दिसून येत आहे.सध्या या पक्षांना पाहायला आणि त्याचे फोटो काढायला अनेक पक्षीप्रेमी गर्दी करताना दिसून येत आहे.वसई विरार नालासोपाऱ्यात ही आता सिमेंटचे जंगल वाढत असल्याने फ्लेमिंगोचे प्रमाण कमी होत असल्याच्या भावना पक्षीप्रेमी व्यक्त केल्या आहेत…