Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं, पण कोरोनाच्या संकटात डॉक्टर हाच देव: जलसंपदा मंत्री जयंत पाटील
![What is this financial planning ?; Jayant Patil's question to Nirmala Sitharaman](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/jayant-patil-fb-1200.jpg)
मुंबई : “कोरोनामुळे लोकांना लक्षात आलं की देव वाचवू शकत नाही, तर डॉक्टर हाच खरा देव आहे. अशा अंधश्रद्धांपेक्षा शास्त्रावर लक्ष द्यावे. आमचा देखील रामावर तेवढाच विश्वास आहे. माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. धर्मापेक्षा शास्त्र महत्वाचे आहे. कोरोनामुळे धार्मिक सणांना देखील परवानगी नाहीय.
गणपतीबाबतीत देखील मर्यादा पाळाव्या लागतील, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. “राम मंदिर होत असेल तर आमचा विरोध बिलकुल नाही. पण कोरोनाच्या संकटात कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने कोरोनामुळे लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी धार्मिक सणांना मर्यादा ठेवण्याचे आदेश दिले आहेत”, असं जयंत पाटील यांनी अधोरेखित केलं आहे.