Breaking-newsराष्ट्रिय
आसाममध्ये तेल विहरीजवळ भीषण स्फोट

आसाममधील बागजानामधील तेलाच्या विहरीजवळ एक भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात तीन परदेशी तज्ज्ञ जखमी हाले आहेत. गेल्या एक महिन्यांपासून ही आग लागली आहे. ती अजूनही आटोक्यात आलेली नाही.
ऑइल इंडियाच्या अधिकाऱ्य़ांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व जखमींना डिब्रुगडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अँथनी स्टीवन रेनॉल्ड्स, डग डलास आणि क्रेग नील डंकेन अशी या तज्ज्ञांची नावे आहेत. सर्व तज्ज्ञ आग विझवण्यासाठी घटनास्थळी उपस्थित होते. तेव्हाच एक भीषण स्फोट झाला.
या विहरीत 28 मे रोजी पहिल्यांदा गॅस निघाला होता. नंतर 9 जून रोजी या गॅसला आग लागली. तेव्हा ही आग विझवताना अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा मृत्यू झाला होता. आता आज पुन्हा स्फोट झाला आहे तेव्हा आग विझवण्याचे काम थांबवण्यात आले आहे.




