सोलापुरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ‘चेस द व्हायरस’ प्रभावीपणे राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/76917805.jpg)
सोलापुरात देखील दिवसेंदिवस कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे. सोलापुरातील ही वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २६ जुलैपर्यंत १० दिवस हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सोलापूर शहर आणि आजूबाजूच्या तालुक्यातील जवळपास ३१ गावांमध्ये हा लॉकडाऊन लागू असणार आहे. या दरम्यान दूध, मेडिकल, रुग्णालय या व्यतिरिक्त सर्व आस्थापना बंद असणार आहेत. अनलॉकच्या कालावधीत ज्या बाजारपेठा सुरू करण्यात आलेल्या होत्या. त्या सर्व बाजारपेठा १० दिवस बंद असणार आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Capture-57.jpg)
सोलापुरातील कोरोना आटोक्यात येण्यासाठी सर्व ते प्रयत्न करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. ‘सोलापूरमध्ये ‘चेस द व्हायरस’ प्रभावीपणे राबवा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत’. तसेच, ‘सोलापुरातील आरोग्य सुविधा तातडीने वाढवण्यावर भर द्या’, असे निर्देश देखील त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.