जिल्हाधिका-यांची महापालिकेच्या वॉर रुमला भेट, कोरोनाची परिस्थिती घेतली जाणून
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/DSC_3112-copy.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कोव्हिड 19 वॉर रुमला भेट दिली. शहरातील कोरोनाची परिस्थिती त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून जाणून घेतली.
यावेळी विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयातील अधिकारी सौरभ राव, शिक्षण आयुक्त मनोज सोळुंके, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, उपायुक्त सुभाष इंगळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण आदी यावेळी उपस्थित होते.
कोव्हिड 19 वॉर रुममधून चालणा-या कामकाजाची माहिती व वारंवार होणारे अपडेट्स यासंदर्भात आयुक्तांनी माहिती सांगितली. त्याचबरोबर वॉर रुममधून शहरातील महापालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवले जाते, याचीही माहिती आयुक्तांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना दिली.