CBSE Result: बारावीचा निकाल जाहीर, कुठे आणि कसा पाहता येणार…
![State Board XII result is 99.63 percent](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Meghalaya-PSC-Result-2020.png)
नवी दिल्ली: CBSE (Central Board of Secondary Education, CBSE) बोर्डाचा नुकताच निकाल जाहीर झालेला आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आलेल्या होत्या. या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
बारावीचे विद्यार्थी CBSE बोर्डाचे निकाल cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत. परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर लागनार आहे. रोल नंबर टाकून निकालाची ऑनलाइन प्रत आपण पीडीएफ स्वरुपात मिळवू शकणार आहात.
CBSE चे निकाल पाहण्यासाठी आपण cbse.nic.in, www.results.nic.in किंवा www.cbseresults.nic.in यापैकी कोणत्याही संकेतस्थळावर भेट देऊ शकता. तिथे गेल्यानंतर आपल्याला लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला सीट नंबर टाकून माहिती अपलोड केली की आपल्याला निकाल दिसणार आहे. हा निकाल ऑनलाइन स्वरुपात दिसणार आहे. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येईल अशी माहिती मिळालेली आहे.