मध्य प्रदेशात वाघांच्या जोडीच्या संरक्षणासाठी सहा निवृत्त जवानांची नियुक्ती
नौरादेही (मध्य प्रदेश) – नौरादेही अभयारण्यात वनसंपदेच्या, प्राण्यांच्या आणि खास करून राधा आणि किशन या वाघाच्या जोडीच्या संरक्षणासाठी नऊ निवृत्त लष्करी जवानांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे निवृत्त लष्करी जवान चोवीस तास नौरादेही अभयारण्यात पहारा देणार आहेत. राधा आणि किशन ही वाघांची जोडी अभयारण्यात आल्यापासून त्यांच्या संरक्षणात वनविभाग कोणतीही कसर ठेवू इच्छित नाही. आणि वाघाच्या कुंपण तोडून गेल्याच्या घटनेनंतर तर त्यांच्या बाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.
जिल्ह सैनिक बोर्डाच्या मदतीने विभागीय वन अधिकारी आणि मुख्य वन संरक्षक यांनी विशेष निवड प्रक्रियेनंतर या नऊ निवृत्त लष्करे जवानाचे निवड केलेली आहे. जंगल भागात कार्य करण्याचे खास प्रशिक्षण आणि अनुभव या जवानांकडे असतो आणि त्यामुळेच त्यांना नौरादेही अभयारण्यात तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.