Breaking-newsराष्ट्रिय
नीट, जेईई परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलल्या; आता सप्टेंबर महिन्यात परीक्षा होणार
![Suicide of NEET student in Tamil Nadu, third incident in four days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/neet-69.jpg)
नवी दिल्ली : इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी होणारी JEE आणि मेडिकलच्या प्रवेशासाठी होणारी NEET या दोन्ही परीक्षांची तारीख दुसऱ्यांदा पुढे ढकलली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता विद्यार्थ्याचा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्रालयने हा निर्णय घेतला आहे.
नीटची 26 जुलैला होणारी परीक्षा आता 13 सप्टेंबर होणार आहे. तर जेईई मुख्य परीक्षा 18 ते 23 जुलैला होणार होती ती आता 1 ते 6 सप्टेंबर आणि ॲडव्हान्स 27 सप्टेंबरला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही परीक्षांसाठी केंद्र बदलण्याची मुभा देखील विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. 4 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान विद्यार्थी यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.