आलिया आणि महेश भट्टविरोधात गुन्हा दाखल
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर अभिनेत्री आलिया भट्टवर नेटकऱ्यांनी चांगलाच निशाना साधला आहे. शिवाय घराणेशाहीचा वादही शमण्याचं नाव घेताना दिसत नसताना आता दिग्दर्शक महेश भट्ट आणि आलिया भट्ट विराधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे भट्ट कुटुंबासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. दरम्यान आलिया भट्ट स्टारर ‘सडक २’ चित्रपटाचं दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केलं आहे. सिनेमा गृह बंद असल्यामुळे ‘सडक २’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
१९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सडक’ चित्रपटाचा ‘सडक २’ हा सिक्वल आहे. चित्रपटात हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हणत वडील आणि मुलीवर गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम २९५ आणि१२० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून येत्या ८ जुलै रोजी प्रकरणाची सुनावणी होणार आहे.