गेल्या 24 तासांमध्ये 18256 रुग्ण वाढले, आतापर्यंत 5.09 लाख कोरोना रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-1.jpg)
नवी दिल्ली | देशात कोरोना संक्रमितांची संख्या 5 लाख 9 हजार 446 झाली आहे. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी 18 हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले. तर 10 हजार 246 रुग्ण बरेही झाले आहेत. तर महाराष्ट्रात संक्रमितांची संख्या दिड लाखांच्या पार गेली आहे. येथे एका दिवसात सर्वात जास्त 5024 संक्रमित आढळले.
तर अनलॉक-1 म्हणजेच जून महिन्याच्या 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण वाढले. एक जूनला 1 लाख 98 हजार 371 रुग्ण होते. म्हणजे 26 दिवसांमध्ये 3 लाख 11 हजार 095 रुग्ण वाढले आहे. तर संक्रमितांचा आकडा पाच लाखांपेक्षा जास्त झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे रिकव्हरी रेटही झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान रिकव्हरी रेटमध्ये 16 % वाढ झाली आहे. आता रिकव्हरी रेट 58.26% वर गेला आहे.
लॉकडाउन आणि अनलॉक-1 ची तुलना केल्यास सर्वात जास्त 1 लाख 321 रुग्ण जूनमध्ये बरे झाले आहेत. म्हणजेच अॅक्टिव्ह आणि निरोगी रुग्णांमध्ये गॅप वाढला आहे. म्हणजेच एक जूनला जेव्हा अनलॉक-1 सुरू झाले होते. तेव्हा अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 91 हजार 819 होती. तर रिकव्हरी केसची संख्या 87 हजार 692 होती. त्यावेळी दोन्हीमधील अंतर 4127 होते. तर 26 जूनला अॅक्टिव्ह केस 1 लाख 97 हजार 784 आणि रिकिव्हर केस 2 लाख 95 हजार 917 झाले आहे. दोघांमधील अंतर वाढून एक लाख 321 झाले आहे.