Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
धक्कादायक! निसर्गाचा भयंकर घाला; एकाच दिवसात एकाच राज्यात वीज पडून 83 जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/images-1.jpeg)
पाटणा: मान्सूनचे वारे देश व्यापत असल्याची चांगली बातमी येत असतानाच निसर्गाचा दुर्दैवी फटका उत्तर भारतात काही भागात विशेषतः बिहारमध्ये बसलेला आहे. पावसानं काही भागात थैमान घातलं आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने बिहारमध्ये एकाच दिवसात 83 जणांचा जीव घेतला आहे.
भारतीय हवामान विभागाने उत्तर भारतात अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी केलेला आहे. पुढच्या 48 तासांत जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ढग आणि पावसाची लक्षणं दिसल्यावर लोकांना आपापल्या घरातच राहाण्याचं आवाहन केलेलं आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असंही आवाहन त्यांनी केलं आहे. 83 मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत नितीश कुमार यांनी जाहीर केली आहे.