Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
#CoronaVirus | हिंगोलीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 239 वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/corona-new-4.jpg)
हिंगोली | जिल्ह्यातील विलगीकरण कक्षातून पळालेल्या तरुणाने प्रशासकीय यंत्रणेच्या तोंडाला चांगलाच फेस आणला आहे. हा तरुण कनेरगाव नाका येथील रहिवासी असल्याने कनेरगाव नाका गाव प्रशासनाकडून सील करण्यात आले आहे. सदर तरुणाला हिंगोली शहरात असलेल्या विलगीकरणकक्षात ठेवण्यात आलं होतं.
या तरुणाचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे सामाजिक संक्रमण होताना यंत्रणेचे अधिकारी चांगले घामाघूम झालेत, त्याचबरोबर रात्री उशिरा आलेल्या अहवालात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून त्यांच्या संपर्कातील 9 जणांना सुद्धा क्वारंटाईन करण्यात आले सध्या हिंगोली जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 239 वर पोहचली असून त्यापैकी 201 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 38 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.