breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

भारतीय दूतावासातील दोन अधिकारी बेपत्ता

इस्लामाबाद | पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील भारतीय दूतावासाचे दोन अधिकारी बेपत्ता झाले आहेत. सोमवारी वृत्तसंस्थांनी ही माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली. दोन्ही अधिकारी सकाळी 8.30 वाजता बेपत्ता झाल्याची माहिती आहे. याबाबत सध्या कोणतीच ठोस माहिती मिळाली नाही.

मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे की, भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला या दोन्ही अधिकाऱ्यांचा लवकर शोध घेण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीमधील पाकिस्तानी दूतावासच्या दोन अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपात पकडण्यात आले होते. या दोघांना 24 तासात परत पाकिस्तानात पाठवण्यात आले होते.

दिल्ली पोलिसांनी 1 जूनला पाकिस्तानी दूतावासच्या दोन अधिकाऱ्यांना हेरगिरी करताना पकडले होते. हे दोघे एका व्यक्तीला पैसे देऊन सुरक्षेसंदर्भातील महत्वाची कागदपत्रे घेत होते. दोघेजण व्हिजा असिस्टेंट पदावर कार्यरत होते. पकडल्यानंतर त्यांनी स्वतःला भारतीय नागरिक सिद्द करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याकडे फेक आधार कार्ड, भारतीय मुद्रा आणि आयफोन मिळाला होता.भारताने या दोघांना 24 तासांच्या आत पाकिस्तानात परत पाठवले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button