बिग बींनी दिलं कलाकारंना मजेशीर चॅलेंज, पहा काय आहे ते…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Bachchhhan_gulabo_sitabo_June_9.jpg)
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट दोनच दिवसांत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून बिग बी या चित्रपटाचं सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.
‘गुलाबो-सिताबो’मध्ये बिग बी आणि आयुषमान खुराना हे दोघं घरमालक आणि भाडेकरु यांची भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता प्रमोशनचाच एक भाग म्हणून बिग बींनी सेलिब्रिटींना एक चॅलेंज दिलं आहे. विशेष म्हणजे त्यांचं हे चॅलेंज अनेक कलाकारांनी स्वीकारलं आहे. बिग बींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत कलाकारांना चॅलेंज दिलं आहे.
बिग बींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते चित्रपटातील एक डायलॉग बोलताना दिसत आहेत. हा डायलॉग न थांबता सलग पाच वेळा बोलण्याचं चॅलेंज त्यांनी दिलं आहे. “गुलाबो की खटर-पटर से तितर-बितर सिताबो, सिताबो के अगर-मगर से उथल-पुथल गुलाबो”, असा हा डायलॉग आहे.
बिग बींनी दिलेलं हे चॅलेंज अभिनेता कार्तिक आर्यन, भूमि पेडणेकर, आयुषमान खुराना या कलाकारांनी स्वीकारलं असून त्यांनी त्यांचे व्हिडीओ शेअर केले आहेत.विशेष म्हणजे बिग बींच हे चॅलेंज लोकप्रिय ठरताना दिसत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ चार लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे. बिग बी आणि आयुषमानचा ‘गुलाबो सिताबो’ १२ जून रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.