पंजाब नॅशनल बँकने घटवला व्याज दर, होम-कार लोन एकदम स्वस्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/pnb_-bank.jpg)
मुंबई : लॉकडाऊन ५ लागू झाल्यानंतर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दोन प्रमुख बँकांनी नुकत्याच झालेल्या व्याजदरात कपात केल्यानंतर आता देशातील दुसर्या क्रमांकाची पंजाब नॅशनल बँकने आपल्या व्याजदरामध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. पंजाब नॅशनल बँक ग्राहकांना अत्यंत कमी व्याज दरावर गृह कर्जे आणि वाहन कर्जे प्रदान देणार आहे.
दुसर्या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकने (PNB) सोमवारी कर्जावरील रेपो दरात 0.40 टक्के सूट जाहीर केली. आता हा व्याजदर ७.०५टक्क्यांवरून ६.६५ टक्के होईल.
तज्ज्ञांच्या मते, घर किंवा कार खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या लोकांसाठी हा दर फारच कमी आहे. आता ग्राहकांना कर्जावरील कमी व्याजदराचा थेट लाभ मिळणार आहे. बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की या व्यतिरिक्त सर्व परिपक्वता अवधीच्या कर्जासाठी आधारित व्याज दर एमसीएलआर आधारित ०.१५ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत.
बचत खात्यांवरील व्याज दरही बँकेने ०.५० टक्क्यांवरून कमी करून ३.२५ टक्के केले आहेत. सुधारित दर १ जुलैपासून लागू होणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.