#CoronaVirus:जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 48 लाख पार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-890x395-3.png)
जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 48 लाखांच्या पार पोहोचली आहे. कोरोनामुळे संसर्ग झालेल्या सर्वाधिक रुग्णांची संख्या अमेरिकेमध्ये आहे. येथे 15 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. परंतु, चिंताजनक गोष्ट म्हणजे, कोरोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये रूस दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे जगभरात 320,121 लोकांचा मृत्यू झाला असून 19 लाख 07 हजार 992 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. अख्खं जग कोरोनापुढे हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 48 लाख 90 हजारांवर पोहोचला आहे. तर कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3 लाख 20 हजारांवर पोहोचली आहे.
वर्ल्डोमीटरने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कालपर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत खालच्या क्रमांकावर असलेला रूस आज दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे. तर अमेरिकेमधील कोरोना बाधितांची संख्या 15 लाखांच्या पार पोहोचली आहे. तसेच रूसमध्ये कोरोना बाधितांचा आकडा 2 लाख 90 हजारांवर पोहोचला आहे. दरम्यान, मृतांच्या आकडेवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून त्यानंतर ब्रिटन, इटली आणि फ्रान्सचा क्रमांक आहे.