breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: सोलापुरात कोरोनाचे दोन मृत्यू; २१ नव्या रूग्णांची भर
सोलापुरात रविवारी सायंकाळपर्यंत करोनाबाधित नव्या २१ रूग्णांची भर पडली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. रूग्णांमध्ये दोघे आरोग्य कर्मचारी असून आतापर्यंत रूग्णसंख्या ३८५ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्याही दोनने वाढून २६ वर पोहोचली आहे. करोनाचा फैलाव वाढत पूर्व आणि दक्षिण भागानंतर आता पश्चिम भागातही होऊ लागला आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी येथील आरोग्य क्षेत्रातील एक व्यावसायिक सोलापुरात न्यू पाच्छा पेठेत वास्तव्यास असताना त्याला करोनाची बाधा झाली आहे.