Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
प्रधानमंत्री किसान सन्मान अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार 700 कोटी रुपये जमा झाले – सीतारमण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Nirmala-Sitharaman.jpg)
नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सरकारद्वारे 20 लाख कोटी रुपयांच्या ‘आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेज’चा तिसरा ब्रेकअप देत आहेत. आज अर्थमंत्री ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’, एलटीजीसी, डीडीटी कर कमी करणे आणि पायाभूत सुविधा आणि कृषी यावर लक्ष केंद्रित करत आहेत.
पॅकेजचा तिसरा ब्रेकअप
1) कृषि इन्फ्रास्ट्रक्चर
अर्थमंत्री म्हणाल्या मागील दोन महिन्यात आम्ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची पाउले उचलली. प्रधानमंत्री किसान सन्मान अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार 700 कोटी रुपये टाकले.
लॉकडाउनदरम्यान 5600 लाख दुध कॉपरेटिव संस्थांनी खरेदी केले. दुध उत्पादकांना 4100 कोटी रुपये मिळाले.
कृषी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 1 लाख कोटी रुपये दिले जातील. यातुन कोल्ड चेन, पिक कापणीनंतर व्यवस्थापनाची सुविधा मिळेल. शेतकऱ्यांची कमाईदेखील वाढेल.
2) फूड प्रोसेसिंस
मायक्रो फूड एंटरप्राइजेजसाठी 10 हजार कोटी रुपये फंडची स्कीम आहे, ही क्लस्टर बेस्ड असेल.
यातून 2 लाख खाद्य प्रसंस्करणला लाभ मिळेल. लोकांना रोजगार मिळेल, कमाईचे साधन वाढले.
3) फिशरीज
मत्स्य संपदा योजनेची घोषणा बजेटदरम्यान करण्यात आली होती, याला लागू करत आहोत.
यातून 50 लाख लोकांना रोजगार मिळेल. भारताचा एक्सपोर्ट वाढेल.
मत्स्य पालन वाढवण्यासाठी मच्छीमारांना जहाज आणि त्याचा विमा दिला जाईल.
समुद्री आणि आंतरराष्ट्रीय मत्स्य पालनासाठी 11 हजार कोटी रुपये आणि 9 हजार कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जारी करणार.
4) पशुपालन
केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकुर म्हणाले की, अनेक आजारांसाठी जनावरांना व्हॅक्सीन मिळत नाहीये. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. सर्व जनावरांचे व्हॅक्सीनेशन केले जाईल.
व्हॅक्सीनेशनमध्ये 13 हजार 343 कोटी रुपये खर्च होतील. यातून 53 कोटी पशुधनाला आजारापासून मुक्ती मिळेल. जानेवारीपासून आतापर्यंत 1.5 कोटी गाय आणि म्हशींना व्हॅक्सीन लावण्यात आले.
पशुपालनाच्या इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी 15 हजार कोटी रुपयांचा फंड दिला जाईल.