Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: वसईत १३ नवीन रुग्ण, दोघांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/8-6.jpg)
वसई विरार शहरात मंगळवारी १३ नवीन रुग्ण आढळून आले असून २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.यामुळे शहरातील एकूण रुग्ण संख्या २३९ वर पोहोचली आहे.मागील २४ तासात शहरात १३ नव्या रुग्णाची भर पडली. त्यात नालासोपारा मधील ८, विरार मधील ३ आणि वसईतील २ रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारी विरार मध्ये राहणाऱ्या ४८ वर्षीय महिलेचा तर नालासोपारा मधील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. मंगळवारी २ रुग्ण करोना मुक्त झाले असून एकूण करोना मुक्त संख्या १२७ एवढी झाली आहे.