Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Lockdown: पायपीट करत निघालेल्या 37 हजार मजुरांना एसटी बसद्वारे त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडलं
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/MSRTC-770x433-1-1.jpg)
ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर अशा विविध विभागातून आपल्या गावाकडे पायपीट करत निघालेल्या 37 हजार मजुरांना, एसटी बसद्वारे त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात आलं आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 563 बसद्वारे 12 हजार 459 मजुरांची राज्याच्या सीमेपर्यंत वाहतूक करण्यात आली. तर आजपर्यंत 2 हजार 209 बसद्वारे 37 हजार 327 मजुरांची वाहतूक करण्यात आली आहे. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटकातील सीमेपर्यंत त्यांना सोडण्यात आलं आहे