Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यात दिवसभरात 91 पॉझिटिव्ह, पाच जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/20-2.jpg)
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात झपाट्याने वाढत आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात करोनाबाधितांची संख्या कमालीची वाढली आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 91 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पाच जणांचा करोरनामुळे मृत्यू झाला आहे.याचबरोबर पुणे शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 2 हजार 573 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत एकूण 149 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. 14 दिवसानंतर 69 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण 1 हजार 89 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.