Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: मिरा-भाईंदरमध्ये नव्या १४ रुग्णांची भर, १६ जण कोरोनामुक्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/20-2.jpg)
मिरा भाईंदर शहरात रविवारी १४ नवे रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्ण संख्या आता २५६ एवढी झाली आहे. विशेष म्हणजे आज १६ रुग्णांना करोनामुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. रविवारी नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मिरा रोडमध्ये ६, भाईंदर पूर्वेला ५ आणि पश्चिमेला ३ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत १४३ रुग्णांना करोनामुक्त करण्यात आल्यामुळे १०६ करोनाबाधित रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आज समोर आलेल्या अहवालात दोन वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. या मुलावर भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.