Breaking-newsपिंपरी / चिंचवडपुणे

#Coronolockdown:पुणेकरांचा संभ्रम मिटला, ‘या’ वेळेत सर्वांना पेट्रोल-डिझेल मिळणार

पुणे : पेट्रोल डिझेल विक्रीबाबत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एक नवा आदेश काढला आहे. कंटेन्मेंट झोन वगळता पुण्यात इतरत्र सकाळी सात ते संध्याकाळी 7 या वेळेत सर्वांना पेट्रोल डिझेलचा पुरवठा होणार आहे.

पुणे महानगरपालिका प्रशासनाने काल सामान्य नागरिकांनाही पेट्रोल आणि डिझेल देण्याची भूमिका घेतली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने इंधन केवळ अत्यावश्यक सेवा आणि प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांनाच मिळणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे पुणेकरांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुण्यात सर्व नागरिकांना सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत पेट्रोल डिझेल देण्याचे स्पष्ट आदेश दिल्याने संभ्रम मिटला आहे. विशेष म्हणजे गाडीत पेट्रोल डिझेल भरताना पास, ओळखपत्र दाखवण्याचीही आता गरज नाही. लॉकडाऊन कायम असल्याने नागरिकांनी घरातच राहायचे आहे, मात्र अत्यावश्यक काम असल्यास गाडीने बाहेर पडता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group