breaking-newsपिंपरी / चिंचवड
निरोगी असल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी करु नये – महापौर माई ढोरे
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग लक्षात घेता बाहेरगावी जाण्याकरिता नागरिकांनी आरोग्यविषयक तपासणी करुन निरोगी असल्याचे प्रमाणपत्र घेणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यादृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वास्तव्यास असणा-या परंतु महाराष्ट्रातील इतर ठिकाणी तसेच परराज्यात जावू इच्छिणा-या नागरिकांसाठी आरोग्यविषयक तपासणी करण्याची सुविधा महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे.
वैद्यकिय तपासणी करिता नागरिकांनी गर्दी न करता मास्कचा वापर ब सोशल डिस्टन्सिंगचे शिस्तीने पालन करुन रुग्णालयीन प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सदर वैद्यकिय सुविधेचा लाभ महानगरपालिकेच्या नजीकच्या रुग्णालयामध्ये जाऊन घेण्याचे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.