#Coronolockdown:कोरोना विषाणूवरून अमेरिकाने नुकसान भरपाई साठी चीनविरुद्ध दंड थोपटले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Donald-Trump-1-1.jpg)
वॉशिंग्टन. कोरोना या भयंकर साथरोगाचा उगम चीनमधील वुहान प्रांतातून झाला. फेब्रुवारीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला तरी याच्या बातम्या चीनमधून बाहेर येण्यास मात्र मार्च उजाडला होता. कारण, तोवर युरोप अमेरिकेपर्यंत या कोरोना विषाणूने थैमान घातले होते. दरम्यान, आता अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यांच्यासह इतर देशांनी या कोरोना विषाणूबद्दल थेट चीनला जबाबदार ठरवत त्या देशाविरुद्ध दंड थोपटले आहेत. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनला लक्ष्य केले. ते म्हणाले, कोरोनाबद्दल अमेरिका चौकशी करत आहे. चीनकडून नुकसान भरपाई वसूल केली जाईल. वास्तविक, जर्मनीतील एका वृत्तपत्राप्रमाणे अमेरिका चीनकडून भरपाई वसूल करणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर ट्रम्प यांनी हे उत्तर दिले. ते म्हणाले, ‘आम्ही रक्कम ठरवलेली नाही. मात्र ती खूप मोठी असेल.
अमेरिका, इंग्लंड, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी आता थेट चीनमध्ये वुहान प्रांतात असलेल्या प्रयोगशाळांचीच तपासणी करण्याची तयारी सुरू केली असून यासाठी चीनकडे परवानगीही मागण्यात आली होती. परंतु चीनने ही परवानगी नाकारल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी आता थेट चीनला इशारा दिला आहे. वर या कोरोनामुळे झालेल्या नुकसानीची वसुलीकरण्याची धमकीही दिली आहे. यासाठी कोरोनाबाधित देशांना चीनविरुद्ध एकत्र करण्याचा प्रयत्न अमेरिकेने सुरू केला आहे. यामुळे जागतिक पातळीवर आता कोरोनाचा वेगळा राजकीय प्रभाव पहावयास मिळू शकतो.
जर्मनीतील एका वृत्तपत्राने चीनकडे कोरोना फैलावाबद्दल दंड म्हणून भरपाई मागण्याची भूमिका मांडली होती. नेमक्या हीच भूमिका आता अमेरिकेनेही घेतली आहे. जर्मनीने चीनकडे मागितलेल्या भरपाईपेक्षाही जास्त दंड असेल, असे संकेत ट्रम्प यांनी दिले. जर्मनीप्रमाणे नुकसानीसाठी चीनकडून १०.६७ लाख कोटी रुपये दंड मागेल का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. यावर ट्रम्प म्हणाले की, जर्मनी वेगळा विचार करत आहे. आम्ही वेगळे पाहत आहोत. जर्मनी जेवढ्या भरपाईबद्दल सांगतोय त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीत ही दंडाची रक्कम असायला हवी.