RBIने Mutual Fund इंडस्ट्रीसाठी विशेष लिक्विडिटी स्कीमची केली घोषणा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/02/RBI_23_9_2013.jpg)
नवी दिल्ली | म्युचुअल फंड इंडस्ट्रीवर लिक्विडिटी दबाव कमी करण्यासाठी भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) ने म्युचुअल फंड्ससाठी 50 हजार कोटी रुपयांच्या लिक्विडिटी फॅसिलिटीची घोषणा केली. अमेरिकेतील म्युचुअल फंड हाउस फ्रँकलिन टेम्पलटनने भारतात 6 डेट फंड्स बंद केले. त्यामुळे, यात लिक्विडिटीचे संकट निर्माण होण्याची भीती होती. याच पार्श्वभूमीवर आरबीआयने सोमवारी ही महत्वाची घोषणा केली आहे.म्यूचुअल फंड्ससाठी आरबीआयची लिक्विडिटी स्कीम 27 एप्रिलपासून 11 मे 2020 पर्यंत किंवा पूर्ण रकमेचा वापर होईपर्यंत, या दोन्हीपैकी जे आधी होईल तोपर्यंत लागू असेल. बाजाराची परिस्थिती लक्षात घेऊन या टाइमलाइन आणि रकमेवर फेरविचार केला जाऊ शकतो असा दिलासा देखील आरबीआयने दिला आहे. कोव्हिड-19 मुळे बाजारात अस्थिरता वाढली आहे.
कोरोनामुळे म्युचुअल फंडवर लिक्विडिटी अर्थात तरलतेचा दबाव आहे. हाच दबाव लक्षात घेता 50 हजार कोटी रुपयांच्या म्युचुअल फंडासाठी विशेष तरलता सुविधा दिली जात आहे.