Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus | औरंगाबादमध्ये एकाच घरातील तीन महिलांना कोरोना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Maharashra-corona-1.jpg)
औरंगाबाद | शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी आणखी तीन महिला रुग्णांची त्यात भर पडली आहे. हिलाल कॉलनी येथील 26, 18, 31 वर्षीय महिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे औरंगाबादेतील कोरोना रुग्णांची संख्या 47 झाली आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी यांनी दिली. विशेष बाब म्हणजे या तिघी महिला एकाच घरातील आहेत. त्यांना कोणापासून बाधा झाली असावी याचा शोध आरोग्य विभाग घेत आहे.