Breaking-newsताज्या घडामोडी
#IndiaFightsCorona: हॉस्पिटल-मेडिकल वगळता सांगोला शहर पूर्णपणे बंद; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/15-5.jpg)
सांगोला । महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्याकरिता परवा पासून म्हणजेच शनिवार दि.25 एप्रिल २०२०, रविवार दि.26 एप्रिल २०२० व सोमवार दि.27 एप्रिल २०२० या तीन दिवसात हॉस्पिटल व मेडिकल वगळून संपूर्ण शहर बंद राहील, असे आवाहन सांगोला नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
सांगोला शहरातील सर्व नागरीकांनी कळविण्यात येते की या तीन दिवसात अत्यावश्यक सेवेतील दुध विक्री सेवा सकाळी ७ ते ९ या वेळेतच सुरु राहतील.
मडिकल व हॉस्पिटल सोडुन इतर सर्व दुकाने, फळे व भाजीपाला विक्री देखील या दिवशी बंद राहतील.
तरी सांगोला शहरातील सर्व व्यावसायिकांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आपली दुकाने बंद ठेवावीत व हे तीन दिवस कोणत्याही नागरीकांनी घराबाहेर पडु नये असे आवाहन सांगोला नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.