#CoronaVirus | इम्रान खान यांची होणार कोरोना टेस्ट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/imran-khan.jpg)
इस्लामाबाद | कोरोनाचा धोका जगात वाढत आहे. आता पाकिस्तानमधून एक बातमी हाती आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची कोरोनाची टेस्ट होणार आहे. इम्रान खान हे एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. आता त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. ही चाचणी करण्याचा सल्ला त्यांच्या वैद्यकीय टीमने दिला आहे. त्यानंतर इम्रान खान हे कोरोना चाचणी करणार आहेत. या वृत्ताला दुजोरा पंतप्रधान इम्रान यांचे सल्लागार डॉ. फैजल सुल्तान यांनी दिला आहे. इम्रान खान हे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्यानंतर इम्रान खान यांच्या आरोग्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर आता इम्रान खान यांची करोनाची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानमध्ये आतापर्यंत १० हजारांच्या घरात लोकांना करोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर १९७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे २ हजार ६६ लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती आहे. पाकिस्तानातही कोरोनाचा धोका वाढत आहे. आता पंतप्रधान इम्रान हेही पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले. त्यामुळे याची सर्वाधिक चर्चा पाकिस्तानात सुरु आहे. येथील प्रसिद्ध एधी फाऊंडेशनचे प्रमुख अब्दुल सत्तार एधी यांचा मुलगा फैसल एधी याला करोनाची लागण झाली आहे. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. फैसल याने १५ एप्रिल रोजी इम्रान खान यांची भेट घेतली होती. त्यामुळे इम्रान खान यांच्या आरोग्याबद्दलही चिंता व्यक्त होत होती.