#Coronavirus: अहमदाबादमध्ये रक्तद्रव उपचार चाचण्या सुरू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Corona-blood-1.jpg)
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्य़ात करोनाच्या चाचण्या जास्त प्रमाणात होत असल्याने तेथे करोना रुग्णांची संख्या जास्त दिसून येत आहेत. शहरातील काही रुग्णालयांतून रक्तद्रव उपचार चाचण्या रविवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत.
अहमदाबादमध्ये रुग्णांची संख्या १००२ झाली असून त्यात शहरातील ९७८ रुग्ण आहेत. बाकीचे जिल्ह्य़ाच्या परिसरातील आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त विजय नेहरा यांनी दिली. आता दिल्ली व मुंबईपेक्षा अहमदाबादमधील रुग्णांची संख्या जास्त दिसत आहे. एकूण १४,००० नमुने तपासण्यात आले असून शहराची लोकसंख्या ८० लाख आहे. हॉटस्पॉट भागातील लोकांचे नमुने यात तपासण्यात आले आहेत. लाखात २४९० निदान चाचण्या करण्यात आल्या असून दिल्लीत हे प्रमाणात लाखात ११०३ आहे. आम्ही स्वत:हून विविध भागात चाचण्या करण्यास सुरुवात केल्याने रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे काळजीचे कारण नाही. असे नेहरा म्हणाले.
त्यांनी सांगितले की, संकुल भागात जाऊन चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होत आहे. ९७८ पैकी सत्तर टक्के रुग्ण हे आम्ही केलेल्या पाहणीमुळे दिसून आले आहेत, अन्यथा ते सापडले नसते. ‘हॉटस्पॉट’ भागातील नव्वद टक्के नमुने घेण्यात आले असून रुग्णांची संख्या कमी होईल.
दरम्यान शहरातील पहिली रुग्ण असेलली महिला बरी होऊन एसव्हीपी रुग्णालयातून रविवारी घरी गेली. तिला १७ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.