पुण्यात एकाच दिवशी कोरोना संसर्गाने आठजणांचा बळी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/20.jpg)
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
पुण्यात कोरोनाची लागण झालेल्या आठ जणांचा बुधवारी दिवसभरात मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या बळीचा आकडा 16 झाला आहे. एकाच दिवसात एवढ्या जणांचा जीव गेल्याने पुण्यात घबराट पसरली आहे. दुसरीकडे, दिवसभरात कोरोनाचे नवे 18 रुग्ण सापडले आहेत.
पुणे शहरातील कोरोनाच्या 95 रुग्णांवर डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे या हॉस्पिटलमधील खाटांची क्षमता संपल्याने आता कोरोनाच्या रुग्णांना अन्य हॉस्पिटलात दाखल करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. त्यानुसार बोपोडी खेडेकर आणि लायगुडे हॉस्पिटलमधील 100 खाटा मोकळ्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही रुग्णालयांत सध्या “क्वॉरंटाइन”चे रुग्ण आहे. खबरदारी म्हणून रुग्णांच्या उपचाराची सोय करण्यात येत असल्याचे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.
शहरात कोरोनाचा पहिला बळी 30 मार्चला गेला. त्यानंतर आठवडाभरातच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून, मंगळवारी दिवसांत तिघांचा मृत्य झाला होता. त्यानंतर बुधवारी पहाटेच पहिला बळी गेला. तर, त्यानंतर ससून, नायडू आणि काही खासगी रुग्णालयांतील रुग्णांचाही मृत्य झाला.