Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी-चिंचवडमधील 4 भाग आज मध्यरात्रीपासून होणार ‘बंद’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/pcmc-2.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील दिघी, घरकुल, खराळवाडी व थेरगाव अशा चार भागातील काही परिसर बुधवारी (ता. ८) मध्यरात्री १२ वाजेपासून सील करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून व शहरातील बाधित रुग्णांची संख्या विचारात घेऊन काही भागात नागरिकांच्या फिरण्यावर मर्यादा आणणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत शहरातील चार भाग सील करण्यात येत असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले.
हे भाग होणार सिल
- – घरकुल, चिखली : बिल्डिंग ए-1 ते 20. पवार इंडस्ट्रीयल परिसर, नेवाळे वस्ती.
- – जामा मशीद, खराळवाडी, पिंपरी : गिरमे हाॅस्पिटल- अग्रसेन लायब्ररी- क्रिष्णा ट्रेडर्स- चैताली पार्क सोसायटी- खराळ आई गार्डन- ओम हाॅस्पिटल- ओरिएंटल बँक- सीटी प्राईड हाॅटेल- क्रीस्टल कोर्ट हाॅटेल.
- – कमलराज बालाजी रेसिडेन्सी, रोडे हाॅस्पिटल, दिघी : एमव्हीएस
काॅम्प्युटर- सर्वथा गिफ्ट शाॅपी- साई मंदिर- अनुष्का आॅप्टिकल- रोडे हाॅस्पिटल. - – शिवतीर्थनगर, पडवळनगर, थेरगाव : शिरोळे क्लिनिक- गणेश मंदिर- निदान क्लिनिक- किर्ती मेडिकल- रेहमानिया मशीद- आॅर्किड हाॅस्पिटल- अशोका सोसायटी.