Breaking-newsपिंपरी / चिंचवड
#CoronaVirus: पिंपरी-चिंचवडमधील चार विभाग आज मध्यरात्रीपासून होणार सील
पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने थैमान घातले असून शहरातील काही परिसर आज मध्यरात्रीपासून सील करण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील चार भाग सील करण्यात येणार आहेत. यामध्ये १) घरकुल रेसीडेन्सी बिल्डींग क्र. ए १ ते २० चिखली, २) जामा मस्जिद, खराळवाडी, ३) कमलराज बालाजी रेसीडन्सी, रोडे हॉस्पीटल जवळ, दिघी, भोसरी, ४) शिवतीर्थ नगर, पडवळनगर थेरगाव. या भागांचा समावेश आहे.