breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#WAR AGAINST CORONA: पुणे जिल्‍ह्यात 161 निवारागृहे सुरु: जिल्‍हाधिकारी राम

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

विस्थापित कामगारांकरिता पुणे जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत 51 निवारागृहे  तर साखर कारखान्यांमार्फत 110 अशी 161 निवारागृहे सुरु करण्यात आली असून त्‍यामध्‍ये एकूण 37 हजार 629 कामगार असल्‍याचे जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले, जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या 51 निवारागृहांमध्ये एकूण 3 हजार 413 विस्थापित कामगार व साखर कारखान्यांमार्फत सुरु केलेल्या निवारागृहांमध्ये एकूण 34 हजार 216 कामगार वास्तव्यास आहेत. सद्यस्थितीत अशासकीय स्वयंसेवी संस्था व जिल्हा प्रशासनामार्फत 3413 कामगारांना तसेच विविध ठेकेदारांमार्फत 88 हजार 496 कामगारांना अशा एकूण 91 हजार 909 कामगारांना भोजनाची सुविधा पुरविण्यात येत आहे. 

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील बेघरांकरीता पुणे शहर तहसिल कार्यालय व पुणे महानगर पालिका हद्दीतील 20  शाळांमध्ये निवारा कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. ह्या सर्व व्यक्ती पुणे शहरामध्ये बिगारी काम करणा-या आहेत.  सोशल डिस्ट्नसिंगचा (सामाजिक शिष्‍टाचार) अवलंब करुन एका खोलीत सात किंवा आठ जणांची  राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. पुणे  महानगरपालिकेमार्फत तसेच  स्वयंसेवी संस्थांमार्फत दोन वेळा चहा, नाष्‍टा तसेच जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. याशिवाय सर्वांची दररोज आरोग्यविषयक तपासणी करण्यात येत आहे. सर्वांना मास्क, सॅनिटाइझर, साबण, तेल तसेच टॉवेलचा पुरवठा करण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेच्‍या वा.ब.गोगटे  विद्यालय निवारा केंद्र, नारायण पेठ, पुणे येथे एकूण  81 व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे.   यामध्ये  1 नेपाळी व्यक्ती  असून तिचे नाव महेंद्र काडाईत आहे. याशिवाय परराज्यातील 16 व्‍यक्‍ती तर महाराष्ट्रातील 64 व्‍यक्‍ती आहेत.

पुणे महानगरपालिकेच्‍या नागरवस्ती विकास योजनेंतर्गत रात्र निवारा प्रकल्प, सेनादत्त सांस्कृतिक हॉल, नवी पेठ, पुणे येथे एकूण 12 व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे. यामध्ये  1  नेपाळी व्यक्ती असून तिचे  नाव  देवजा असे आहे. परराज्यातील 2 व्‍यक्‍ती तर महाराष्‍ट्रातील 9 व्‍यक्‍ती आहेत. पुणे महानगरपालिकेचे  क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे निवारा केंद्र, भवानी पेठ, पुणे येथे एकूण 37 व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे. यामध्ये  परराज्यातील 5 व्‍यक्‍ती तर महाराष्ट्रातील 32 व्‍यक्‍ती  आहेत.

पुणे महानगरपालिकेचे  सावित्रीबाई फुले प्रशाला निवारा केंद्र, भवानी पेठ, पुणे येथे एकूण  49 व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे. यामध्ये  परराज्यातील 14 व्‍यक्‍ती तर महाराष्ट्रातील 35 व्‍यक्‍ती आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button